सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : येथील नगर परिषदे अंतर्गत करण्यात आलेली वृक्षालागवड ही फसवेगीरी असुन संबंधीत ठेकेदारावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, जर फसवेगीरी केली तर असेल त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
'दरवर्षीी आपल्या विभागामार्फत वृक्षलागवड व संगोपण आणि हरित वणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. मागील वित्तीय वर्षात सन २०२२-२०२३ आणि या चालु वर्षात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली. परंतु ही वृक्ष लागवडीच्या संख्याचे आकडा आभासी पद्धतीने दाखविल्या सारखा आहे,असा आरोप लढा या संघटनेतर्फे करण्यात येत आहे.
नगरपरिषदेतर्फे कमित कमी ६००० ते ७००० वृक्ष लागवड करव्यात आली आणि खुप मोठ्या प्रमाणात याचा गवगवा करण्यात आला तसेच फोटोसेशन मध्ये दाखवण्यात आले, परंतु ७००० वृक्ष लागवडी पैकी किमान ५०० झाडे सुद्धा आज रोजी शिल्लक नाही. आम्ही प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असता तिथ झाडे दिसत नाही. सोबतच परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणीच्या खुल्या जागेवर किमान ३००० वृक्ष लागवडी पैकी ३० झाडे जगली नाही.
उदाहरणार्थ ७००० व ३००० वृक्ष लागवड असा एकंदरीत १०००० वृक्ष लागवडीचा बोभाटा करण्यात आला. झाडे जगविण्यासाठी ठेवलेला मजूर मात्र, खड्ड्यांनाच पाणी देत आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. त्या वृक्षांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड सुद्धा तिथे उपलब्ध नव्हते.
या संबंधित सर्व वृक्ष लागवड कंत्राटदार आणि शासकीय अधिकारी यांच्या पोटात गेली आहे. वणीत नव्यानेच होऊ घातलेल्या आणि पाटबंधारे विभाग कार्यालय कचरा साठवणूक परिसर येथे लावलेल्या झाडांचा काही थांगपत्ता नाही.
उपरोक्त विषयानव्हे संबंधित वृक्ष लागवड कंत्राटदार यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्ष लागवड २०२२ व २३ चा फज्जा उडाला आहे. ऑक्सिजन देणाऱ्या ऑक्सी लाइफ नावाखाली पर्यावरणाची फसेवीगिरीआणि वणीकर जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालू आहे. या बाबीकडे संबंधित कंत्राटदाराकडून झालेल्या वृक्ष लागवडीवर व या सहकार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर, कार्यकारी अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, लढा संघटनेच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात येईल. यावेळी प्रविण खानझोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे, रूपेश ठाकरे, ललित लांजेवार, राहुल झट्टे, उपस्थित होते.
वणी नगरपरिषद अंतर्गत वृक्षलागवडीत भष्ट्राचार - राहुल झट्टे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 24, 2023
Rating:
