महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे निवेदन


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मणिपूर येथे दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढण्यात आली. देशाला कलंकित करणाऱ्या घटनेचा देश विदेशात निषेध केला जात आहे. देशात महिला सुरक्षित नाही आदिवासी महिलांना विवस्त्र फिरवून धिंड काढली जात आहे व त्यांच्यावर बलात्कार केला जातो,असे भयंकर निंदनीय प्रकार भारतात घडत आहे, मात्र सरकार दुर्लक्ष करत असून बघ्याची भूमिका घेत आहे. यामुळे या मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा व त्यांना पाठीराख्यांचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून त्या नराधमांना फाशी द्या असे निवेदन तहसीलदार निलावाड यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले आहे. 
मणिपूर येथील क्रूर घटना ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार कडून कोणतीही दाखल घेतली
जात नाही आहे. समाज माध्यमांतून जेव्हा हे बघावयास मिळाले तेव्हा देश, विदेशात याचे पडसाद पहावयास मिळत आहे. तरी देखील तेथील भाजप सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे. यावरून हे सरकार असंवेदनशील आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. सरकार ला या देशातील आदिवासी समाजाबाबत यांना काही देणघेण नाही. आदिवासी समाजाला जनावरापेक्षाही हीन दर्जाची वागणूक या मोदी सरकारच्या काळात दिली जात आहे. मणिपुरमध्ये जंगल राज चालू असून मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या वतीने करण्यात आली आहे. 
निवेदन देतांना ता. अध्यक्ष सुमित गेडाम, ता. कार्याध्यक्ष भैयाजी कनाके, राजुभाऊ सिडाम, गंगान्थर लोननसावळे, शंकरराव मडावी, मिलेश आत्राम, दिंगबर आत्राम, सुखदेव आत्राम, जिनेश तामगाडगे, बळीराम आत्राम, मारोती घोटे, तुळशीराम मडावी, रामदास  मेश्राम, रुपेश धुर्वे यासह आदिवासी बंधू उपस्थित होते. 
महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे निवेदन महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 24, 2023 Rating: 5
Powered by Blogger.