श्रीशिवचरीत्र पुष्पांजली ग्रंथ सोहळा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वेध रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्र या इतिहासात काम करणाऱ्या तसेच इतिहास या विषयात प्रबोधन, लेखन, संपादन, प्रकाशन,वितरण, चर्चासत्र इ.विषयाचे आयोजन केले जाते.
मासिक वेध रायगडाचा, गड कोट किल्ल्यांच्या सफरी, इ. कार्यक्रम सातत्याने सादर केले जातात. वेध रायगडाचा प्रतिष्ठान, महा. संस्थेच्या वतीने राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापन दिनानिमित्त श्री शिवचरित्र पुष्पांजली या ग्रंथाचे निर्माण केले आहे.या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी फलटण येथे फलटण संस्थानचे बजाजी नाईक निंबाळकर (छत्रपती शिवाजी महाराज यांचे दामाद) यांचे वंशज व संस्थानिक श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते तर सुभेदार तानाजी मालुसरे ऊमरठ तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज धीरज राजे मोहिते जालना यांचे उपस्थितीत फलटण येथे मुधोजीराजे मनमोहन पॅलेस येथे होणार आहे.
या ग्रंथात महाराष्ट्रातील प्रतिथयश असे एकूण ९५ लेखकांचे शिवरायांचे काही धोरणे, काही सहकारी,शिवरायांचे भावविश्व ,राजांचे काही विचार,काही गड किल्ले असे निवडक ९७ लेख असून या ग्रंथात आपणास पाली, ब्राह्मी, संस्कृत,मराठी हिंदी भाषेतील लेख वाचकास वाचावयास मिळणार आहेत. या ग्रंथाचे संपादन म्हणून वेध रायगडाचा या ग्रंथाचे लेखक श्री. रवींद्र पाटील चव्हाण यांनी केले असून सहसंपादन म्हणून प्राचार्य. डॉ. लता मोरे सुरवाडे खिरोदा आणि प्रा. डॉ. जयश्री शास्त्री चंद्रपूर यांनी केले आहे. तर या संपादक मंडळात प्रा. डॉ. मनस्वी महाके उदगीर, प्रा. डॉ. राजेंद्रसिंह देवरे देऊळगाव राजा, दिलीप वैद्य रावेर, प्रा. गोपाळ राठोड अकोट अणि धनश्री अतकरे अंजनगाव सूर्जी, यांनी काम पाहिले तर या ग्रंथ रचने साठी प्रा. दत्तात्रय देशमुख जालना, प्रा. राजेश अढावू अकोट, ,प्रा. डॉ.मोहिनी उपासनी चोपडा, प्रा. डॉ. मधुकर पवार कोल्हापूर, प्रा. डॉ.अनंत शिंदे, नयना पाटील रावेर,सागर मुने, वणी यवतमाळ आणि प्रा. सुरेश कोळी भडगाव यांनी परिश्रम घेतले. असे, संस्थचे अध्यक्ष प्राचार्य. डॉ.वासुदेवराव पाटिल पारोळा. आणि सचिव सौ. भारती साठे यांनी कळवले आहे.
श्रीशिवचरीत्र पुष्पांजली ग्रंथ सोहळा श्रीशिवचरीत्र पुष्पांजली ग्रंथ सोहळा Reviewed by सह्याद्री चौफेर on July 24, 2023 Rating: 5
Powered by Blogger.