मणिपूर घटना : मारेगावकरानी 'त्या' अमानुष अत्याचार मालिकेचा व त्याच्या पाठीराख्यांचा केला जाहीर निषेध

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. असे सरकार कडून सांगण्यात येत असून नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी देशभरातील महिलांची मागणी आहे. 
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी घडलेल्या व संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या महिला अत्याचाराच्या भीषण घटनेचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला. मणिपूरमध्ये जी घटना समोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. या घटनेने संपूर्ण देशाचा अपमान होत आहे. 140 कोटी देशवासीयांना लाज वाटत आहे. त्यामुळे या घटनेचा देशभर तीव्र निषेध केला जात असून, मारेगाव येथेही या घटनेचा जाहीर निषेध करून त्या निरापराध भगिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, तेथील सरकार चा जाहीर निषेध व्यक्त करून मणिपूर सरकार बरखास्त करण्याची जोरदार मागणीही करण्यात आली. 
मणिपूरमधील घटना देशाला हादरून सोडणारी असून मानवतेला काळिमा फासणारी ही घटना आहे. ह्या अमानुष अत्याचार मालिकेचा व त्याच्या पाठीराख्यांचा तीव्र निषेध मारेगाव येथे सय्यद समीर शहराध्यक्ष युवक काँग्रेस मारेगाव यांच्या नेतृत्वात प्रमुख उपस्थिती राकेश भाऊ खुराणा, गौरी भाऊ खुराणा, खालिद पटेल, अंकुश माफुर बंडूजी गोल्हर, ता. अल्प. सेल अध्यक्ष शाहरुख शेख, ता. उपा. आदिवासी सेल समीर कुळमेथे तसेच यु. कॉ. कार्यकर्ते कपिल कुळमेथे मंगेश उईके, गितेश तामगाडगे, शुभम भरणे, अवि गेडाम, अर्शद सय्यद, सागर मडावी, रणजित गेडाम तसेच शहरातील महिला पुरुष व शेकडो युवकांच्या उपस्थितीत करण्यात आला.

  
मणिपूर घटना : मारेगावकरानी 'त्या' अमानुष अत्याचार मालिकेचा व त्याच्या पाठीराख्यांचा केला जाहीर निषेध मणिपूर घटना : मारेगावकरानी 'त्या' अमानुष अत्याचार मालिकेचा व त्याच्या पाठीराख्यांचा केला जाहीर निषेध Reviewed by सह्याद्री चौफेर on July 23, 2023 Rating: 5
Powered by Blogger.