सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापनेपासून माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, कट्टर मनसैनिक तथा माजी तालुका अध्यक्ष रमेश सोनुले (62) रा. नवरगाव यांचे आज 23 जुलै रोजी मेघे सावंगी येथे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांचे निधनाने राजकीय क्षेत्रात तथा मनसैनिकात शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात काम करत असताना उत्साह ऊर्जा निर्माण करणारे एकमेव रमेश सोनुले,अगदी मनमिळाव स्वभावाचे नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. ग्रामीण जनतेच्या न्यायासाठी गावापातळीवर रमेशभाऊ यांनी पक्ष शाखा उभारून, संघटना मजबूत करून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते राजूभाऊंच्या सोबत खंबीरपणे उभे असायचे. मागील 2 वर्षांपासून रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत असताना आज रविवार ला रमेश भाऊ सोनुले यांनी दुपारी 3.15 वा. मेघे सावंगी येथे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
कार्यकर्त्यांना जीव लावणारा, संकटकाळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा, कार्यकर्ते हेच आपले कुटुंब मानणारा कार्यकर्ता म्हणजे रमेश भाऊ सोनुले. सोनुले भाऊ यांच्या बाबत सांगायचं म्हटलं तर, २००९ मध्ये मारेगांव शहराच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बोगस कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमरण उपोषण केले होते, त्या आंदोलनाला यश आले आणि प्रशासन कामाला लागलं. यात रमेश भाऊ सोनुले यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांची एक विशेष ओळख होती, त्या आंदोलनामध्ये तो दिवस आजही त्यांच्या उपरान्त अविस्मरणीय आहे, हे सर्वाना परिचित असेल.
सोनुले यांनी संपूर्ण राजकीय आयुष्य कार्यकर्त्यांना बळ देण्यात आणि गोरगरीब जनतेची प्रश्न सोडविण्यात घालवली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मशाल हाती घेऊन संघटना गावागावात पोहचवली, मनसे उभारणीत यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. "आता भाऊंचा सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील, आम्ही सर्व तालुक्यातील मनसैनिक त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहे, ईश्वरचरणी प्रार्थना करतो परमेश्वर त्यांच्या परिवाराला बळ देवो, असे भावनिक शोक संदेश मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष भाऊ रोगे यांनी व्यक्त केला आहे.
उद्या दिनांक 24 जुलै रोज सोमवार ला सकाळी 11 वाजता त्यांचेवर नवरगाव येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांच्या निकटवरतीयांनी दिली.
मनसेचा झुंजार माजी तालुका अध्यक्ष रमेशभाऊ सोनुले यांची एक्झीट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 23, 2023
Rating:
