सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मागील आठ ते दहा दिवसापासून वरुण राजाने दडी मारली आहे. वातावरणात नाकी नऊ आणणारा कडक्याचा उकाडा. त्यामुळे अंगाची लाहिलाही होत असून, नेहमीप्रमाणे दुपार पर्यंत घामाने ओलं होऊन अंग न्हावून निघत असतांना अचानक आज वातावरणात बदल झाला. तीन च्या नंतर वातावरणात "थंडा थंडा कुल कुल" वाटायला लागले. या नैसर्गिक कुलिंग मुळे शेतकऱ्यांसह नागरिक पावसाची दाट शक्यता वर्तवू लागले.
ढगाळ वातावरण,मात्र सोसाट्याचा वारा, त्यात गारवा प्रत्येकाला भेदून जात होता. परंतु पाऊस मात्र आला नाही. असे वाऱ्याचे नाटक जवळपास अर्धा चालले. पाऊस आता येईल मग येईल म्हणत,गर्मीन तापलेलं अंग थंडगार झाले खरं... परंतु यामुळे लागलेली वरुण राजाची आस कोरडी ती कोरडीच राहिली.
रोहणी, मृग कोरडा गेला आणि आता आर्द्रा नक्षत्र लागले. मात्र, पाऊसाचा कुठेही थांग पत्ता लागत नसल्याने बेपत्ता असलेल्या पावसाने शेतकरी चिंतेत आला आहे. पेरणीचे गणित बिघडेल म्हणून शेतकऱ्यानी पावसाची वाट न बघता, तज्ञाला न जुमानता वावर सारे टिबून टाकले. दरम्यान,काही अंशी पाऊस हजेरी लावून गेला, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आणि धडाधड पेरणी करून सर्व मोकळे झाले. "तेल गेलं तूप गेलं हाती आले धुपारणे"येईल म्हणायची वेळ तर येईल नाही ना, परंतु आता मात्र, पावसाअभावी चटके किती सोसावे लागत आहे. हे मागील काही दिवसापासून बघत आहात.
मात्र, आज अचानक वातावरण बदलले, ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा, सर्वत्र गारवा आहे. सायंकाळी तरी पाऊस पडेल असे अंदाज बांधले जात असतांना वाट शेतकरी शेतमजूर जोरदार पावसाची बघतो, हे विशेष...!!
सोसाट्याचा वारा... वातावरणात "थंडा थंडा कुल कुल"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 04, 2023
Rating:
