रान डुकराच्या हल्ल्यात होतकरू मजूर ठार...


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वणी परीक्षेत्रातील जंगलात शेळ्या चराई करित असताना एका होतकरू शेतमजुरावर रानडुकराने हल्ला चढवून ठार केले. आज मंगळवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेने वणी उपविभागात एकच खळबळ उडाली असून शेतमजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नामदेव सोयाम (64) असे रानडुकराच्या हल्ल्यात जागीच ठार झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. वणी परीक्षेत्रातील जंगलात कायर येथील नामदेव हा गावातील व स्वतःच्या शेळ्या चराई करायचा. आज तो नेहमी प्रमाणे कायर परिसरातील जंगलात बक-या चराई करण्यासाठी घेऊन गेला. दरम्यान, आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास झुडपात दडून बसलेल्या रानडुकराने अचानक नामदेव यांचे वर हल्ला चढवीला. या हल्ल्यात 64 वर्षीय नामदेव यांना धूम ठोकण्यासाठी कवडीचीही संधी मिळाली नसल्याने या वृद्ध शेतमजूराला रान डुकरांच्या हल्ल्यात नामदेवला आपला जीव गमवावा लागला आहे.

नामदेव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, स्नुषा व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळावी अशी आर्तहाक मागणी नागरिकांतून होत आहे.
रान डुकराच्या हल्ल्यात होतकरू मजूर ठार... रान डुकराच्या हल्ल्यात होतकरू मजूर ठार... Reviewed by सह्याद्री चौफेर on July 04, 2023 Rating: 5
Powered by Blogger.