विद्युतचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मेंढोली येथे शेतशिवारात जिवंत विद्युत तारांचा झटका लागुन एका चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यु झाला. सदर घटना बुधवार दिनांक 12 जुलै रोजी सायंकाळी उघडकिस आली. ही घटना शिरपुर पुलिस स्टेशन हद्दीतील असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

सुनिल पुरुषोत्तम ढवस (40) रा. मेंढोली असे करंट चा झटका लागलेल्या मृतकाचे नाव आहे. सुनिल यांची वरझडी शिवारात शेती असुन ते ट्रॅक्टर व लाईन दुरुस्तीचे खाजगी काम करत होते असे समजते.

काल बुधवार रोजी सायंकाळी साडे सहा वाजताचे सुमारास संजय जिवतोडे यांचे शेतातील विद्युत खांबावर चढून लाईनचे काम करित असताना सुनीलला विद्युत प्रवाह वाहत असलेल्या तारेचा झटका लागल्याने ते खाली फेकल्याने  त्यांचा मृत्यू झाला. सुनिल हा घरातील कर्ताधर्ता पुरुष त्याच्या अशा अकाली निधनाने ढवस कुटूंबावर दुःखांचे डोंगर कोसळले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, बघ्याची एकच गर्दी उसळली होती. पोलिसांना माहिती मिळताच शिरपूर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करित मृतदेह उत्तरीय तपासणी साठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

पुढील तपास शिरपूर पोलीस करित आहे.
विद्युतचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू विद्युतचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on July 13, 2023 Rating: 5
Powered by Blogger.