सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरालगत असलेल्या लालगुडा ग्रामपंचायतचे सरपंच धनपाल गोकुळ चालखुरे यांचे नागपूर येथे दीर्घ आजाराने काल सायंकाळी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने वणी शहरासह विभागात शोककळा पसरली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी अचानक तब्बेत खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. तिथे त्यांचे वर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान काल सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. सरपंच धनपाल चालखुरे एक सच्चा, पारदर्शक, समाजाच्या हितासाठी तत्पर असणारा अतिशय मनमिळाऊ व सुस्वभावी व्यक्तीमत्व असलेल्या धनपाल चालखुरे यांची सर्वांनाच आपुलकी होती. समाज कार्यातही ते नेहमी अग्रेसर असायचे. त्यांच्या अकाली निधनाने गावासह वणी शहर तथा मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.
सरपंच धनपाल यांचे पाठीमागे त्यांची पत्नी, एक मुलगी असा आप्त परीवार असुन, त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी लालगुडा मोक्षधाम अंत्यसंस्कार येथे होणार आहे.
लालगुडा येथील सरपंच धनपाल चालखुरे काळाच्या पडद्या आड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 13, 2023
Rating:
