हातात धारदार शस्त्र बाळगून धुमाकूळ घालणाऱ्या तरुणास केली अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात पेट्रोलिंग करीत असताना वणी पोलिसांना  माहीती मिळाली की, एक इसम हातात धारधार शस्त्र घेऊन दिपक टॉकीज परीसरात दहशत निर्माण करीत आहे. ही घटना 5 जुलै रोजी घडली.

माहितीच्या आधारे पोलीस दिपक चौपाटी जवळील दिपक बार येथे पोहचले असता, तिथे अरविंद केशव तांबे (41) रा. सेवानगर (वणी) हा इसम धारदार तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याचे निदर्शनास आले. सदर आरोपी विरुद्ध 4,5 शस्त्र अधिनियम सहकलम 135 मपोका प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.

सदरची कारवाई डॉ. पवन बनसोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, ना. गणेश किंद्रे उप.वि.पो.अ. वणी, यांचे मार्गदर्शनात पो.नि. अजित जाधव, ठाणेदार पोलीस स्टेशन पोउपनि माधव शिंदे, आशिष झिमटे, सुहास मंदावार, डगमल, शंकर चौधरी, विशाल गेडाम, यांनी केली.
हातात धारदार शस्त्र बाळगून धुमाकूळ घालणाऱ्या तरुणास केली अटक  हातात धारदार शस्त्र बाळगून धुमाकूळ घालणाऱ्या तरुणास केली अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on July 06, 2023 Rating: 5
Powered by Blogger.