महसूलची कारवाई, अवैध वाहतूक ; एक ट्रॅक्टर जप्त

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : अवैध रेतीची वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर वाहतूक करत असल्याचे माहिती महसूल विभागाला मिळताच भरारी पथकाने आज गुरुवारला दुपारी 12 वाजता धाड टाकली असून घटनास्थळावरून एक ट्रॅक्टर जप्त केले.

काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या नियोजनबद्ध व नायब तहसीलदार यांचे पथकाच्या व्युव्हरचनेने वाळू चोरट्याचे पुरते धाबे दणाणले आहे.

तालुक्यातील वेगांव ते मारेगाव रोड वर वाहन क्रं. एम एच 29 ए के 2388 तर ट्रॉली नं. एस ई एन एन पी 1038 डी एस एल डी हे ट्रॅक्टर एक ब्रास रेती घेऊन वाहतूक करतांना आज दि.6 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आढळले.

दरम्यान,महसूल पथकांच्या चमूने स्पॉट चौकशी केली असता विना परवाना ट्रॅक्टर असलेले निदर्शनास आले. मंडळ अधिकारी गुघाणे यांनी कारवाई करित सदर ट्रॅक्टर जप्त तहसील कार्यालयात जमा केले असून ट्रॅक्टर मालक सुरज प्रकाश टोंगे रा. वेगांव यांच्या मालकीचे आहे.




महसूलची कारवाई, अवैध वाहतूक ; एक ट्रॅक्टर जप्त महसूलची कारवाई, अवैध वाहतूक ; एक ट्रॅक्टर जप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on July 06, 2023 Rating: 5
Powered by Blogger.