सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुका पवणी येथे झालेल्या प्रहार चषक विदर्भ स्तरीय कराटे स्पर्धा मध्ये मारेगांव शोतोकान क्लासचे विद्यार्थीनी गोल्ड स्लिवर, ब्रांझ पटकवून शहराचे नांव गौरवित केले. क्लासचे मुख्य प्रशिक्षक श्री. संतोष राठोड सर (ब्लॅक बेल्ट) यांच्या अथक परिश्रमाला सुवर्ण यश मिळाले. त्यामुळे मारेगाव शहराच्या शिरपेचात मानात तुरा रोवला गेला आहे.
यात रूद्र दुधकोहळे (गोल्ड मेडल), अविका बिडकर (सिल्वर मेडल), भूमिका मस्की (सिल्वर मेडल), तिषा गाडग (सिल्वर मेडल), साई फुरकुटे (सिल्वर मेडल), अंशु अंगेवार (ब्राँझ मेडल), कार्तिक माफुर (ब्राँझ मेडल), शुभ टेकाम (सिल्वर मेडल), संदेश माफुर (सिल्वर मेडल), रुतिक माफुर (ब्राँझ मेडल), या सर्वांनी आपली कर्तबगारी दाखवून मेडल पटकावले तसेच प्रमाणपत्र व ट्रॉफी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
मारेगाव नगरपंचायत येथे कराटेचे प्रशिक्षण निरंतर चालू असून, विद्यार्थानी तालुकास्तरिय, जिल्हास्तरीय व स्टेट लेव्हलपर्यतचे प्रशिक्षण आणि कराटे, लाठी, नॉन चाकू व तलवारीचे प्रशिक्षण नगरपंचायत कार्यालयासमोर देण्यात येत आहे. असे शोतोकान क्लासचे सर्वेसर्वा राठोड सर यांनी सांगितले.
मारेगाव : शोतोकान कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांचे सुवर्ण विजय
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 07, 2023
Rating:
