Top News

नांदेपेरा ते वांजरी रस्त्याची दयनीय अवस्था

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : राज्यमार्गांवरील नांदेपेरा ते वांजरी या सहा ते सात किमी अंतराच्या रोडवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे, खड्यात पाणी साचलेले असतात त्यामुळे या मार्गांवर रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रवाशांना प्रवास करतांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील एखादा पेशंट इमर्जन्सी असला तर, या मार्गांवर प्रवास करता करता त्याला परलोक जायची वेळ येईल? अशी सद्याची दयनीय अवस्था या रस्त्याची झाली आहे. 
नांदेपेरा, मजरा व वांजरी पर्यंत रस्ता पूर्ण उखडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांची स्थिती फारच दयनीय झालेली आहे. त्यामुळे रस्त्याची स्थिती सुधारावी अशी मागणी केली जात आहे. परंतु याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे परिसरातील नागरिकाकडून बोलल्या जात आहेत.

तालुक्यातील बहुतांश ग्रामीण रस्त्यांची हिच स्थिती आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीने या गंभीर समस्याकडे लक्ष घालून संबंधित विभागाला तातडीने उपाययोजना करण्यासाठी सुचना कराव्या व नांदेपेरा ते वांजरी सात किमी अंतराचा प्रवास सुकर करावा अशी मागणी होत आहे. 
Previous Post Next Post