Top News

पाऊस धुआधार : मारेगाव तालुका जलमय; नदी-नाले, शेत बंधारे, तुडुंब भरलेली


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : मारेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला,त्यामुळे झालेल्या अतिवृष्टीने तालुका सर्वत्र जलमय झाला आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर शेती जमीन खरवडून गेल्या आहे.  जुलैच्या पंधरा दिवसानंतरच मारेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला, मात्र या दोन दिवसाच्या धुआधार पावसाने तालुका जलमय होऊन कुंभा व वनोजा या दोन महसूल मंडळात 476 हेक्टर च्या वर पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. 
दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीच्या कामांनाही ब्रेक लागला आहे. कपाशी, तूर व सोयाबीन पिके पाण्याखाली गेली असून, नदीपात्रालगतची बहुतांश पिके वाहून गेल्याचीही माहिती आहे. अद्यापही कपाशी, तूर व सोयाबीन पाण्याखाली असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पिकांचा पंचनामा करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मागील वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची चांगलीच कंबर मोडली असून, त्यातून कसेबसे सावरले असता, यंदा जुलै मधील झालेल्या मुसळधार पावसाने धाकधूक वाढली आहे. प्रशासन स्तरावरून तालुक्यातील पावसाने झालेल्या पिकांचे, घरांचे, इतर नुकसानीची पाहणी सुरु असून अद्याप तरी कुठल्याही मदतीची घोषणा शासनाकडून झालेली नाही. मात्र, या धुआधार पावसाने मारेगाव तालुका जलमय झाला आहे. त्यामुळे नदी-नाले, शेत बंधारे, तुडुंब भरलेली असून शेती जमीन पाण्याखाली येवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. 
Previous Post Next Post