ढगफुटीमुळे महागांव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागाव : तालुक्यातील कासारबेहळ येथे अचानक आलेल्या ढगफुटीमुळे नदी नाले तुडुंब भरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पैनगंगा नदी धोक्याच्या बाहेर वाहत असून श्रावण लोंढे ते अंगणवाडी जवळून पैनगंगा वाहत आहे, नदी जवळील लोकांना प्राथमिक मराठी शाळा येथे हलवले आहे. पोलीस पाटील अशोकराव करे प्रशासनाला वेळोवेळी माहिती देत आहे तसेच अचानक आलेल्या महागाव तालुक्यातील दृश्यामुळे शिरपुली, राहुर, वरुडी, जुनी कासारबेहळ, थार, कवटा, धनोडा, दहिसावळी येथील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला असून पुढील 24 तास पाऊस असल्यास नदीकडच्या गावाला धोका होऊ शकतो. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून बालाजी बिचकुले केशव बिचकुले संजय कलेवाड यांच्या शेतांमध्ये असलेल्या गोटयात रासायनिक खताचे होते संजू कलेवाड यांच्या शेतात पंधरा ते वीस पोते खत होते व बालाजी बिचकुले यांच्या शेतामध्ये अंदाजे दोन्ही भावाचे 30 पोते खत होते अक्षरशः गोठ्यात पाणी घुसल्याने खत विरघळून गेले आहे. तर संजू कलेवाड यांच्या शेतात पेनगंगा नदी मध्ये वाहून गेले पंडित कवाने यांचे 50 ते 60 स्पिंकलर चे पाईप असे बरेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून काल झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांनी झालेल्या अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे म्हणून मुद्दा उपस्थित केला, होता पण त्याहीपेक्षा आज दिनांक 22 रोजी मध्ये रात्री अचानक झालेल्या ढगफुटीमुळे कासारबेहळ येथे पूर्णतः जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. तूर्तास तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे महसूल विभागाचा घटनास्थळी पोहचायला अडचणी येत आहे, त्यामुळे गावातील स्थानिक पदाधिकारी व कर्मचारी यांचेशी भ्रमणध्वनी वरुण माहिती घेत आहे.

मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. गावचे पोलीस पाटील, कोतवाल, सरपंच यांनी संपर्कात राहून परिस्थितीबाबत अवगत करावे.
 - ए.जी. खडसे
तलाठी


आनंद नगर येथे हवाई मार्गाने नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे. जिल्हाधिकारी साहेब स्वतः संपर्कात असून आनंद नगरच्या दिशेने उपविभागीय अधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड टेंभी मार्गे निघाले असून,डॉक्टर व्यंकट राठोड याबाबत सतत वरिष्ठाच्या संपर्कात आहेत. महागाव तालुक्यात हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था नसल्यामुळे माहूर येथे उतरवण्याची व्यवस्था करण्याची कार्यवाही सुरू आहे. अशी समोर आली आहे 

ढगफुटीमुळे महागांव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत ढगफुटीमुळे महागांव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत Reviewed by सह्याद्री चौफेर on July 22, 2023 Rating: 5
Powered by Blogger.