गटशिक्षणाधिकारी यांचे वरील केलेले आरोप तथ्यहीन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील 11 जि.प. शाळेत एकही शिक्षक नाही. शिक्षकांची कमतरता आहे,हा महत्वाचा चिंतन करण्याचा मुद्दा आणि गंभीर विषय आहे. यामुळे विद्यार्थ्यांने शैक्षणिक नुकसान होत आहे. असे असतांना शिक्षक संघटनेच्या वतीने येथील गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरंवार यांचे विरोधात करण्यात येत असलेले आरोपामुळे शिक्षण विभाग वादाच्या भोवऱ्यात असून विविध संघटना गटशिक्षणाधिकारी यांच्या समर्थनार्थ निवेदन संबंधितांना सादर करित आहे.

मारेगाव येथील गटशिक्षणाधिकारी कांडुरंवार यांचे विरोधात करण्यात येत असलेले आरोप तथ्यहीन आहे. अशा आशयाचे निवेदन पहापळ येथील शाळा व्यवस्थापन समीतीच्या वतीने मारेगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या खुलासा दर्शक निवेदनातून करण्यात आला आहे.

मारेगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी कांडुरवार यांच्या कडील कारभार काढून घ्यावा,या प्रमुख मागणीसाठी काही शिक्षक संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या या मागणीच्या विरोधात स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने निवेदने देऊन त्यांच्या मागणीला विरोध दर्शवीत आहेत. गट शिक्षणाधिकारी यांचेवरील आरोप हे निरर्थक असून सर्वांप्रती सहकार्याची भूमिका बाळगणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर अन्याय करण्यात येऊ नये, अशा प्रकारचे निवेदन पहापाळ शाळा व्यवस्थापन समितीने मारेगाव बिडीओ यांचे मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी व जि प शिक्षणाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले.

यावेळी निवेदकर्ते अमोल गुरनुले, भैय्याजी कनाके, संजय भुसारे, सोनाली भट, शीतल भोयर, राहुल भेंडाळे, दिपाली गुरनुले, मारोती आत्राम, विनोद आत्राम शाळा समिती अध्यक्ष व ग्राम.सदस्य आदींची उपस्थिती होती. 
गटशिक्षणाधिकारी यांचे वरील केलेले आरोप तथ्यहीन गटशिक्षणाधिकारी यांचे वरील केलेले आरोप तथ्यहीन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 05, 2023 Rating: 5
Powered by Blogger.