सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : येथील सामाजिक व व्यावसायिक असलेल्या राजूर येथील फैजल बशीर खान मित्रपरिवार तर्फे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार दिवंगत बाळू भाऊ धानोरकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे सुपुत्र मानस बाळू धानोरकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना बॅग व खाऊचे वाटप करण्यात आले.
फैजल बशीर यांनी आपल्या गावाप्रति आपली जाणीव करून दिली की,नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असता गरजवंत विद्यार्थ्यांना जन्मदिनाच्या निमित्ताने शालेय बॅग वाटप करण्यात आले.यावेळी प्रवीण काकडे, जी. प.सदस्य संघदिप भगत, राजूर ग्राम पंचायतच्या सरपंच सौ.विद्याताई पेरकावार, माजी सरपंच विद्यमान सदस्या प्रणिता मो.असलम, माजी सरपंच धनराज देवतळे,मो. असलम, प्रवीण खानझोडे, रुपेश ठाकरे उपसरपंच मुंगोली,निरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन महेश लिपटे सर, आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन फैजल खान यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश तेवर, सय्यद मोसिम आदी फैजल बशीर खान मित्रपरिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
फैजल बशीर खान मित्रपरिवार यांनी जोपासली सामाजिक जाणीव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 05, 2023
Rating:
