सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : यवतमाळ जिल्ह्याचा 16 ही तालुक्यात शासननिर्णया नुसार महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन घेणं
बंधनकारक त्या शासननिर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी.
वणी तालुक्यातील खनिज विकास निधी (DMF) व सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) निधी प्राधान्याने प्रकल्पग्रस्त गावातच खर्च करण्यात यावा.
डोंगरगाव विरकुंड गट ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्तावित चुनखडी प्रकल्प ची जनसुनावनी मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी व परिसरातील नागरिकांवर अन्याय होता कामा नये. असे तीन विषय प्रामुख्याने सादर करण्यात आले.
ब्लॅक डायमंड सिटी नावानी प्रसिद्ध असलेला वणी तालुका हा अनेक समस्या ग्रस्त आहे,ह्या विभागाकडे कोळसा खान म्हनुण नाही तर पैशाची खान म्हणुन बघितलं जाते.व ह्या परिसरात मोठ्या स्वरूपात गौण खनिज, कोळसा, रेती वा इतरही मोठ्या चोरटी वाहतूक होत आहे. ह्या मूळे हा परिसर विकासापासून कोसो दूर आहे व फक्त विकासाची बाता करणारे जनप्रतिनिधी सुद्धा चिरमिरीत व्यस्तच असतात असे एकंदर चित्र पाहावयास मिळत आहे. म्हणून ह्या बाबी कडे लक्ष केंद्रित करण्यासाठी सोमवारी लोकशाही दिनी लढा ह्या संघटनेचे वतीने तक्रारी चा पाऊस निवेदनाच्या माध्यमातुन जिल्हाधिकारी यांच्या दरबारात पाडण्यात आला आहे.
यावर जिल्हाधिकारी साहेब काय कार्यवाही करेल हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे. निवेदन देते वेळी लढा या संघटनेचे प्रवीण खानझोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे, ललित लांजेवार, राहुल झटे, ॲड.रुपेश ठाकरे उपस्थित होते.