माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचा यवतमाळ दौरा



सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या विभागाचे माजी कॅबिनेट मंत्री विजय नामदेवराव वडेट्टीवार यांचा दौरा वणी विधानसभा मतदार संघात होणार आहे.

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद वं पंचायत समिती नगरपरिषद व अन्य पोटनिवडणूका निमित्तानं राज्यातील निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर वणी उपविभागीय क्षेत्रात काँग्रेस कमिटीने मोट बांधत नवनिर्वाचित नेतृत्वात सहभागी होऊन माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नियोजित दौऱ्याचे आयोजन केले जात आहे. त्यांच्या दौऱ्यानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्ते आता सक्रिय झाले असून पुढील रणनीती कशी आखली जाईल यावर विशेष भर देऊन त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी "डेट" 16 जुलै 2023 फिक्स करण्यात आली आहे. अशी माहिती काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षानी दिली. 

माजी मंत्री विजय वडेट्टीवार दुपारी 10 वाजता चंद्रपूर वरुन यवतमाळ साठी रवाना होतील. वणी माजी आमदार यांचे निवास्थानी पोहचतील. त्यानंतर दुपारी 4.45 वाजता नागपूर कडे प्रयाण करतील. 

तूर्तास राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचा यवतमाळ दौरा कार्यक्रम रविवार दि. 16 जुलै 2023 पुढीलप्रमाणे :
 

सकाळी 10.00 वाजता 
चंद्रपूर येथून वणी जि.यवतमाळ कडे प्रयाण 
 
सकाळी 11.00 वाजता
वणी जिल्हा यवतमाळ येथे आगमन व माजी आमदार श्री. वामनराव कासावार यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट

सकाळी 11.30 वाजता 
श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प मालार्पण कार्यक्रमास उपस्थित
 स्थळ -: टिळक चौक, वणी 

सकाळी 11.40 वाजता
दि. वसंत को-ऑपरेटिव्ह सहकारी संस्था वणी येथे कार्यकर्त्यांशी संवाद व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थित
 स्थळ -: दि. को-ऑपरेटिव्ह सह.संस्था सभागृह, वणी
 संदर्भ -: श्री.आशिष कुलसंगे
अध्यक्ष दि. वसंत को-ऑपरेटिव्ह सहकारी संस्था वणी

दुपारी 12.15 वाजता
वणी येथून सद्गुरु श्री.जगन्नाथ बाबा देवस्थान (भांदेवाडा) कडे प्रयाण

दुपारी 12.30 वाजता 
सदगुरु श्री. जगन्नाथ बाबा देवस्थान दर्शन (भांदेवाडा)

दुपारी 12.45 वाजता
भांदेवाडा येथून मारेगाव कडे प्रयाण

दुपारी 1.00 वाजता
मारेगाव येथे आगमन व शेतकरी सुविधा केंद्र येथे तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव च्या वतीने आयोजित शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना अर्थसहाय्य, कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थित
 स्थळ -: शेतकरी सुविधा केंद्र, सभागृह मारेगाव
 संदर्भ -: 1) श्री. मारुती गौरकार तालुका अध्यक्ष, काँग्रेस कमिटी मारेगावं 
2) श्री. गौरीशंकर खुराना सभापती, कृउबा समिती मारेगाव

दुपारी 4.00 वाजता 
मारेगाव येथून मार्डी ता.मारेगाव कडे प्रयाण
 
दुपारी 4.15 वाजता
 मार्डी ता. मारेगाव येथे आगमन व ग्रामपंचायत कार्यालय मार्डी येथे सदिच्छा भेट
 संदर्भ-: सरपंच श्री. रविराज चंदनखेडे

सायंकाळी 4.45 वाजता 
मार्डी तालुका मारेगाव येथून नागपूर कडे प्रयाण 

सायंकाळी 6.15 वाजता
"कमलाई निवास' रामदास पेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम
श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक, माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब.

माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचा यवतमाळ दौरा माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचा यवतमाळ दौरा Reviewed by सह्याद्री चौफेर on July 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.