सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा किन्हाळाच्या अध्यक्षपदी भास्कर कपाळकर तर उपाध्यक्षपदी सौ अमृता काकडे यांची निवड करण्यात आली.
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा किन्हाळा येथील शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी सरपंच शुभम भोयर यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित पालकांच्या अनुमतीने व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भास्कर कपाळकर, उपाध्यक्षपदी सौ अमृता काकडे यांची निवड करण्यात आली तर शिक्षण तज्ञ म्हणून नामदेव मडावी, रमेश शास्त्रकार, दिपक बोबडे, गुणवंत येरमे, पुजा आत्राम, निमिषा देठे, वैशाली आसेकर यांची समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका कु. स्मिता देशभ्रतार, कु. चित्रा डाहाके (सहा.शिक्षिका), प्रशांत तोरे, प्रवीण देठे, धीरज डांगाले, अनंता आसेकर,अमोल बोढाले, प्रवीण काकडे ,विठ्ठल बलकी, मारोती मडावी यांच्यासह पालक उपस्थित होते.