राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2023 च्या शिक्षक पुरस्कारासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

या पुरस्कारासाठी https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेब पोर्टलवर नावनोंदणी सुरू झालेली असून इच्छुक शिक्षकांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी 15 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी केले आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.