Top News

वृद्ध इसमाची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : एका वृध्द इसमाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 8 जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आली. सदर घटना शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील आहे.

भिमा किसन आत्राम (65) रा.कुर्ली असे मृतकाचे नाव आहे.
शनिवारी 8 जुलै रोजी सायंकाळी भीमा आत्राम यांनी आपल्या शेतात जाऊन विषारी द्रव प्राशन केले यात त्याचा जागेवर मृत्यू झाला.

सदर घटनेबाबत शिरपूर पोलिस स्टेशन यांना माहिती दिली असता मृतदेह रात्री उशीरा ग्रामीण रुग्णालय वणी येथे उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आले. भिमा यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली व आप्तपरिवार आहे.

आज रविवार दिनांक 9 जुलै रोजी दुपारी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.
Previous Post Next Post