सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वरूड (सालेभट्टी) गट ग्रामपंचायत येथील ग्रामस्थ, शिक्षण सुधार समिती, व पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन पंचायत समितीच्या आवारात शाळा भरवून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यात आले. चक्क! प्रशासनाच्या आवारात शाळा भरल्याने शासन प्रशासनाचा भोंगळ कारभार व शिक्षणाचा खेळखंडोबा चहाट्यावर आला आहे. दरम्यान, तोबा बघ्यांची गर्दी दिसून आली.
वरुड येथील ग्राम. शिक्षण सुधार समिती व ग्रामपंचायत सदस्य तसेच पालकांनी मारेगाव पंचायत समितीच्या आवारात शाळा भरवून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज सोमवारी शाळा भरवली. येथील जिल्हा परिषद शाळेला 1 ते 7 वर्ग असून 43 विद्यार्थी संख्या आहे. मात्र, शाळेला केवळ एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
शाळेत एकच शिक्षक आणि विद्यार्थी 43 संख्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्जनात अडचण होत असल्यामुळे पालक तथा ग्राम., शिक्षण समिती च्या वतीने पंचायत समितीचे आवारात "क्लास" भरवून अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास तात्काळ गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन मंगळवारला शिक्षक उपलब्ध करून देण्याची लेखी हमी दिली. आणि आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र, उदया दि.4 जुलै रोजी शिक्षक उपलब्ध, शाळेवर शिक्षक हजर न झाल्यास आम्ही पालक व ग्रामस्थ पुन्हा पंचायत समिती च्या आवारात शाळा भरवण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला. यावेळी देविदास भट, राजू घोसरे, प्रमोद काकडे, रानु नावडे, प्रफुल काकडे, शरद पवार, प्रफुल भोकरे, कवडू चहानकार, गजानन भोभर, दिनेश झट्टे, संतोष पवार, सुधाकर लोंढे, अशोक टोंगे, सिमा पवार, सीमा पवार, किर्तीमाला घोसरे, देवका पवार, संजय पवार, लता घोसरे, उषा पवार, ज्ञानेश्वर जगताप, शंकर भोकरे, महादेव घोसरे, आदींची उपस्थित होती.
पालकांनी भरवली पंचायत समितीच्या आवारात शाळा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 03, 2023
Rating:
