नदी काठावरील मातीचे ढिगारे स्थलांतर करा, तीच पूरपरिस्थिती भेडसावेल; प्रशांत भंडारी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पावसाळा लागला पूरपरिस्थिती च्या अनुषंगाने उचित शक्यता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा म्हणून वनोजा देवी येथील उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून काही उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मागील वर्षी २०२२ मध्ये वैनगंगा, वर्धा, नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व जिल्ह्यातील सतत होत असल्याने पावसामुळे वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द प्रक्लप, वर्धा नदीवरील अप्पर वर्धा प्रकल्प, व निम्न वर्धा प्रक्लप, व वर्धा नदीच्या उप नद्यांवरील धरणांमधून अधिकचे पाणी विसर्ग प्रवाहित करण्यात आला होता. अतिवृष्टी पाण्याचा येवा वाढल्याने धरणातून पुन्हा पाणी विसर्ग करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्याकाठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या महापूराचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील नदी काठ च्या गावांना चांगलाच बसला, त्या झालेल्या पूरपरिस्थितीतून अजूनही नागरिक सावरले नाही.
परंतु वनोजा, शेलू, चिंचमंडळ, व इतर गावांना संभाव्य पूरपरिस्थितीला एकोना (मार्डा) कोळसा खान सर्वस्वी जबाबदार असून दापोरा, चिंचमंडळ, शेलू, कोसारा, शिवणी, आपटी, वनोजा देवी, इत्यादी गावांना वेकोली च्या नदीपात्रालगत टाकलेल्या मातीच्या उचं ढिगाऱ्यामुळे महापुराचा धोका निर्माण झाला असून यामुळे गावकऱ्यांचे शेतकरी, शेतमजूर, जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून एकोना (मार्डा) कोळसा खाणी कडून कोणत्याही प्रकारचे उपाययोजना केल्या जात नाहीत तसेच नुकसान भरपाई किंवा मदत कार्य केले जात नाही.
मात्र, मागील वर्षी झालेल्या महापुराचा चांगलाच फटका यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा नदी काठावरील गावांना बसला, परंतु शासनाने कोणतीच मदत शेतकऱ्यासह गावकऱ्यांना केली नाही. तसेच वनोजा देवी येथील नागरिकांची अन्नंनादशा झाली अनेक घरातील जीवन उपयोगी समानाचे नुकसान झाले आणि त्या संकटातून कसे बसे सावरले. मात्र, पुन्हा याही वर्षी सुद्धा उंच मातीच्या ढिगाऱ्यामुळे यंदाच्या पुराचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा नदी काठावरील व काही अंतरावरील गावांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकोना (मार्डा) कोळसा खाणीतील मातीची ढिगारे दुसरीकडे स्थलांतर करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक सामाजिक तथा उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी यांनी दिलेल्या निवेदनातून केली.
नदी काठावरील मातीचे ढिगारे स्थलांतर करा, तीच पूरपरिस्थिती भेडसावेल; प्रशांत भंडारी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 18, 2023
Rating:
