सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
तालुक्यातील नागरिकांच्या समस्या प्रशासन दरबारी जैसे थे आहे. यात घरकुल, निराधार, पीकविमा व इतर योजनेचे काम प्रलंबित असून ह्या सर्व सोडवण्यासाठी आमदार बोदकूरवार आज सोमवारला तहसील कार्यालयात येणार आहे अशी माहिती आहे.
जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यात शासन आपल्या दारी हा शासनाचा उपक्रम गावोगावी राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून विविध योजनाचा लाभ नागरिकांना मिळत असला तरी निराधार, पीकविमा, घरकुल यासारख्या योजना मात्र अपवाद आहे. याबाबत तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर येत आहे. शासनाचे प्रशासनावर वचक नसल्याने प्रशासनाचा कारभार ढेपाळला आहे.
एक दिवस शासन आपल्या दारी आल्याने होणार नाही तर हा उपक्रम निरंतर लाभार्थ्यांना निशुल्क मिळावा अशा टिकेची झोड विरोधकांनी उठवली जात असतांना वणी विधानसभा मतदार संघांचे दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार हे तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी येत आहे. आता आमदारांच्या भेटीतून समस्या कितपत सुटतात व प्रश्न मार्गी लागतात याकडे जनतेचे लागले लक्ष..
आमदार संजय रेड्डी बोदकूरवार येणारं जनतेच्या भेटीला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 19, 2023
Rating:
