सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी नविन सी एन जी गॅस प्रकल्प होत असल्याने परीसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट सेंद्रिय शेती, ऊर्जा पीक शेती, बायोमास फार्मिंग आणि नाविन्यपूर्ण ग्रामीण प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, बायोमास आणि कचरा यांसारख्या गैर-अन्न फीडस्टॉकपासून शाश्वत स्वच्छ इंधन तयार करणे हाच आहे. त्यासाठी लागणार कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून पिकवला जाणार आहे. या गॅस निर्मिती केंद्राकरिता लागणारे रोपटे कंपनीमार्फत उपलब्ध करून देणार असल्याची माहिती यावेळी संबंधितांनी दिली. येथील परिसरात प्रथमच एवढ्या मोठ्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्या गेल्याने या प्रकल्पाची स्तुतीसुमणांनी स्वागत केले जात आहे.
एम सी एल (MCL) उत्पादक संस्था (MPO) शेतकऱ्यांना जैवइंधन उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यासाठी, शाश्वत आणि सेंद्रिय शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण समुदायांना आर्थिक लाभ देण्यासाठी कंपनी सक्षम असून हा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांना वरदान ठरणार आहे.
भूमिपूजनाप्रसंगी माजी सरपंच भास्कर धानफुले, सरपंच रविराज चंदनखेडे, डायरेक्टर गजानन चौधरी, गजानन आसुटकर, प्रवीण कुचनकर, अतुल बोबडे, सारंग लांबट, विकास चौधरी, प्रवीण मिलमिले, राहुल चट्टे, ग्राम उद्योजक बंडू टोंगे, सुरेश मुरस्कर, विजय घोटेकर, आकाश बदकी, धनंजय आसूटकर, भैरव राऊत, अक्षय गलाट, अक्षय एकरे, प्रतीक गावंडे, किशोर उलमाले, संजय वानखेडे, प्रेमानंद देठे, तुफान अन्सारी, विनोद ठेंगळे, अनंता निब्रड,आदी मंडळी सह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
मार्डी येथे सी एन जी गॅस प्रकल्प निर्मिती केंद्राचे भूमिपूजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 29, 2023
Rating:
