मारेगाव: चंद्रभागा स्वच्छता अभियानासाठी ५० गूरूदेव सेवकांसह पंढरपूर रवाना

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : गुरुपौर्णिमेच्या पर्वावर जिल्ह्यातील विविध भागातील गुरुदेव प्रेमी, उपासक चंद्रभागेच्या स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी हजारो सेवक निघाले असता, आज (गुरुवार) ला दुपारी 4 वा. मारेगाव तालुक्यातील 50 गुरुदेव सेवकासह पंढरपूर कडे रवाना झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हजारों हातांनी चंद्रभागा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असं मत रवाना झालेल्या गुरुदेव उपासकांनी व्यक्त केले.

आषाढी यात्रेमुळे पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण होतात. "सत्ता कि आयु न बढि,सेवा कि ध्वजा सदा खडी" असं महाराजांनी आपल्या भजनवाणीतून सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा मदतीचा हात मिळाल्यास चंद्रभागा स्वच्छता अभियान वेगाने रावबिता येईल, या भावनेने पंढरपुरात चंद्रभागा स्वच्छता अभियान, पंढरपूर येथील ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूरचे संचालक सेवकराम दादा यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दि.1,2,3, जूलै रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यांच्या या अभियानात रूपेश ढोके, रामदास ढेंगळे, दिवाकर गाडगे, सूरज येवले, सह मारेगाव तालुक्यातील कानडा हिवरा वनोजा येतील कार्यकर्ते चंद्रभागा स्वच्छता अभियान साठी पंढरपूर रवाना झाले असून उद्या सायंकाळपर्यंत सर्व सेवक पंढरपूर ला पोहचणार आहे.

हे अभियान गेल्या 9 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानात महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होतात, त्यामुळे आम्ही सुद्धा सहभागी होत आहोत,असे गुरुदेव उपासक रुपेशभाऊ ढोके यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले. 
मारेगाव: चंद्रभागा स्वच्छता अभियानासाठी ५० गूरूदेव सेवकांसह पंढरपूर रवाना मारेगाव: चंद्रभागा स्वच्छता अभियानासाठी ५० गूरूदेव सेवकांसह पंढरपूर रवाना Reviewed by सह्याद्री चौफेर on June 29, 2023 Rating: 5
Powered by Blogger.