एक दिवस शासन आपल्या दारी, बाकी दिवस समस्यांची डोकेदुखी...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 'शासन आपल्या दारी' उपक्रमामुळे नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, या उद्देशाने शासकीय योजनांचा कार्यक्रम तालुक्यात सुरु असून दि.९ जून रोजी पिसगांव ग्रामपंचायत कार्यालय येथे हा कार्यक्रम झाला. मात्र, यातून शासनाने लाभार्थ्यांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी केला आहे.

शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी 'शासन आपल्या दारी, उपक्रम राबवित असतांना पैसे घेऊन कार्यक्रम राबविणे गैर नाही, जनतेच्या अनेक समस्या कार्यालयात प्रलंबित असून जनतेला कार्यालयात कामासाठी चकरा माराव्या लागते. मात्र, आगामी येत असलेल्या सार्वत्रिक निवडणूका जिंकण्यासाठी शासनाचा उपक्रम प्रशासनाकडून राबवून, पुढील निवडणूका जिंकण्याचा डाव सत्ताधारी पक्षाचा असु शकते, असीही शंका मारोती गौरकार यांनी व्यक्त केली.

एक दिवस शासन आपल्या दारी, बाकी दिवस समस्याची डोकेदुखी, अशी तालुकास्तरावर अवस्था असून योजना मिळविण्यासाठी नागरीकांना अनेक अडचनींचा सामना करावा लागतो. त्यात लोकप्रतिनिधीचा वशिला, वेळ प्रसंगी पैसे देऊन कामे करावी लागते, येथील भुमिअभिलेख कार्यालयात असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असून अशाच एका प्रकरणात तेथील कर्मचारी मागील वर्षी लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यानी ट्रॅप केला होता.

शेतकऱ्यांना कृषी पंपाची विज जोडणी अनेक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पैसे घेऊन केली जाते, तहसिल कार्यालयात निराधार लाभार्थ्यांना वेळेवर मानधन मिळत नाही, त्यामुळे हा उपक्रम सुद्धा जर जनतेकडून पैसे घेऊन कागद पत्रे अपडेट होत असेल तर ही शासन आपल्या दारी, ह्या लोकांभिमुख उपक्रमातून जनतेची लुट करण्याचा प्रकार होय असेही काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच म्हणणं आहे.
एक दिवस शासन आपल्या दारी, बाकी दिवस समस्यांची डोकेदुखी... एक दिवस शासन आपल्या दारी, बाकी दिवस समस्यांची डोकेदुखी... Reviewed by सह्याद्री चौफेर on June 10, 2023 Rating: 5
Powered by Blogger.