आदर्श शिक्षक गजानन नरवाडे सरांना स्वामी विवेकानंद अभ्यासिका मारेगाव च्या वतीने निरोप समारंभ...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज स्वामी विवेकानंद अभ्यासिका मारेगाव येथे जिल्हा परिषद शिक्षक श्री. गजानन नरवाडे सर यांच्या शिक्षकी बद्दली निमित्त स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या वतीने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. मेश्राम सर (माध्यमिक शिक्षक) उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यासिकेचे आधारस्तंभ श्री. प्रविण खंडाळकर सर (माध्यमिक शिक्षक, शासकीय आश्रम शाळा, जूनोणी) तसेच दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून बलकी सर लाभले होते. स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या माध्यमातून मारेगाव सारख्या आदिवासी बहुल व काही प्रमाणात इतर तालुक्याच्या तुलनेत मागास असलेल्या तालुक्यात स्पर्धा परीक्षेची जर विद्यार्थ्याना तयारी करावयाची असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी शिकवणी लावायला जावं लागतं असे आणि ते सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्तींना परवडणारे नव्हते याचाच सारासार विचार करून स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे मूळ खंडाळकर सरांनी मारेगाव येथे रोवली. मग याचं शिकवणी वर्गाला कोणताही मोबदला न घेता विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेचे धडे श्री. नरवाडे सरांनी दिले.
वेळोवेळी अभ्यासिकेच्या विद्यार्थ्याना परीक्षाभिमुक मार्गदर्शन सरांनी दिले. श्री. खंडाळकर सरांनी आपल्या भाषणातून श्री. नरवाडे सरांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून श्री. मेश्राम सरांनी सुद्धा आपले अनुभव व्यक्त केले. तसेच बलकी सरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रविण पोटे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच विद्यार्थांनी सुद्धा आपले सरांविषयी अनुभव कथन केले.

त्यामध्ये संतोष कनाके, विलास गोवारकर, प्रफुल सुर, मिलिंद मनवर व कु. ययाति हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुमित पोरटे सर (पदवीधर शिक्षक जि. प. नांदेड) यांनी केले तर प्रास्ताविक कुणाल बोरुले यांनी केले व आभार रोशन हेपट यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी उपस्थित होते व अशाप्रकारे निरोप समारंभाचा कार्यक्रम विद्यार्थांनी यशस्वी पार पडला.
आदर्श शिक्षक गजानन नरवाडे सरांना स्वामी विवेकानंद अभ्यासिका मारेगाव च्या वतीने निरोप समारंभ... आदर्श शिक्षक गजानन नरवाडे सरांना स्वामी विवेकानंद अभ्यासिका मारेगाव च्या वतीने निरोप समारंभ... Reviewed by सह्याद्री चौफेर on June 10, 2023 Rating: 5
Powered by Blogger.