हातात तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शहरात धारदार शस्त्र (तलवार) हातात घेऊन परिसरात धुमाकूळ घालण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात एका शाळेच्या मोकळ्या मैदानात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करू पाहणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शस्त्रासह अटक केली होती. हि घटना ताजी असतांना पुन्हा एका 24 वर्षीय युवकाला 11 जूनला रात्री 12 ते 12.30 वाजताच्या दरम्यान, तलवारीच्या जोरावर दहशत निर्माण करू पाहणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.

सुमित देविदास राखुंडे (24) रा. नटराज चौक (वणी) असे हातात तलावर घेऊन परिसरात धुमाकूळ घालीत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याचे जवळील धारदार तलवार हस्तगत केले असून त्याचे वर भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्राच्या माहितीनुसार सपोनि प्रवीण हिरे हे रात्री शहरात गस्त घालत असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली.  पोलिस शिपाई वसीम व श्रीनिवास यांना सोबत घेऊन शहरात रात्रीची गस्त घालत होते. त्यांना सुचना मिळताच लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली असता,नटराज चौक येथे एक तरुण धारदार तलवार हातात घेऊन धुमाकूळ घालतांना दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीप शिरस्कर, सपोनि प्रवीण हिरे, पो.कॉ. वसिम व श्रीनिवास यांनी केली.



हातात तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात हातात तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात Reviewed by सह्याद्री चौफेर on June 12, 2023 Rating: 5
Powered by Blogger.