लालपुलिया वर अपघाताची मालिका सुरूच, अज्ञात वाहनाने पुन्हा तरुणाला चिरडले

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : लालपुलीया परिसरात दिवसेंदिवस अपघात घडण्याचं सत्र जणू सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. लग्न समारंभात आलेल्या दोन युवकाचा भीषण अपघात या लालपुलिया वर घडला होता. ही घटना ताजी असतांना केरला टायर वर्क येथे नुकताच कामावर रुजू झालेल्या मजूराला रोडच्या कडेला असताना अज्ञात वाहनाने चिरडले. ही घटना आज सोमवारला सकाळी उघडकीस आली.
सदर घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्याची तपासणी केली असता त्याचे जवळ आधार कार्ड मिळाले. त्यात नाव अब्दुल सत्तार मो. नजीर (51) रा. नागपूर असे लिहिले होत असं समजते. 

मृतक हा केरला टायर वर्क येथे कामगार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. हल्ली तो केरला टायर येथे मजुरांसाठी असलेल्या निवास्थानात रहात होता. काल रात्री काही कामानिमित्त तो लालपुलिया परिसरात पायी जात असतांना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. तो अज्ञात वाहनाखाली चिरडल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सदर घटनेची पोलिसांना माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामिण रुग्णालयात पाठवण्यात आला असून याबाबत त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. घटनेचा अधिक तपास वणी पोलिस करीत आहे.
लालपुलिया वर अपघाताची मालिका सुरूच, अज्ञात वाहनाने पुन्हा तरुणाला चिरडले लालपुलिया वर अपघाताची मालिका सुरूच, अज्ञात वाहनाने पुन्हा तरुणाला चिरडले Reviewed by सह्याद्री चौफेर on May 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.