शेतकरी रे माझा बाप...



शेतकरी रे माझा बाप...
राब-राब राबुनिया निघतोस रे त्याच्या अंगातून घाम 
शेतकरी रे माझा बाप...
करितोस जीवाचे तो हाल अन् कुटुंबाची समाजात ठेवतोस रे तो लाज.. 
शेतकरी रे माझा बाप...
पावसाळा आला की होते रे त्याची घणा-घाण.....त्याची झाली जरी घाणा-घाण....पण तो कधीचं मनत नाही दुखते रे माझे अंग पाय.. 
शेतकरी रे माझा बाप...
त्याच्या मनी कुठलाचं नाही गम....पेरणी, डवरनी ,फवारणी करूनचं टाकतो तो दमात-दम....व त्याच्या सोबतीला बैलाची जोड.. 
शेतकरी रे माझा बाप...
पेरणी, डवरनी ,फवारणी झाली की पुन्हा एकच चिंता त्याच्या मनी कधी पडेल रे पाणी आपल्या रानो-रानी
शेतकरी रे माझा बाप...
असाचं वर्षानुवर्ष करितोस रे रानात काम... 
पाहिजे तशी केली नाही त्याने शान..
 शेतकरी रे माझा बाप...
दुखते रे त्याचे खांद, मान तरी कष्ट करितोस रे तो बे-भान
शेतकरी रे माझा बाप...
आमच्या आयुष्यात आले- गेले किती पण दुःखाचे वारे...अन् खाण्याचे वांदे...तरी सुद्धा या महागाई च्या काळात कधीचं झुकू नाही, दिली कोणासमोर त्याची अन् आमची मान.. 
शेतकरी रे माझा बाप...
म्हणूनचं तर लोक म्हणतात माझ्या बापाला अहोऽ ऽ पाटील राम- राम -राम राम..
 शेतकरी रे माझा बाप...!! 
       
शेतकरी रे माझा बाप... शेतकरी रे माझा बाप... Reviewed by सह्याद्री चौफेर on May 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.