आमदार बोदकूरवार यांचा करिष्मा कायम: वणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी अ‍ॅड. विनायक ऐकरे तर उपसभापती विजय गारघाटे यांची निवड


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीकरिता 24 मे रोजी सभेचे आयोजन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये सभा घेण्यात येणार असल्याची नोटीस प्राधिकृत अधिकारी यांनी काढल्यानंतर यावेळी सभापती व उपसभापती पदी कुणाची निवड केली जाते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले होते.

वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस ला धुळ चाखीत भाजप समर्थित पॅनल बहुमताने म्हणजेच 18 पैकी 14 उमेदवार निवडणूक आले किंबहुना संपूर्ण एक हाती विजय मिळवला असे चित्र पाहायला मिळाले. यंदा भाजप समर्थित पॅनलने बाजार समिती मध्ये बहुमताने एंट्री करून सहकार क्षेत्रात आपली ताकत दाखवली. त्यामुळे वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार बीजेपी कडे आल्याने बाजार समितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचा विरोधही विरोधकांकडून केला जावू शकत नाही. त्यामुळे बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी सक्षम उमेदवारांची निवड विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी नियोजन पूर्वक परफेक्ट संचालकांची निवड करून त्यांना या शेतकऱ्यांचा बहुमान समजल्या जाणाऱ्या पदावर कुशल नेतृत्वाना विराजमान केले.

आज बुधवार 24 मे रोजी बाजार समिती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदी अ‍ॅड. विनायक एकरे तर उपसभापती पद भाजपाचे विजय गारघाटे यांना अविरोध बहाल करण्यात आले आहे.

मात्र, महाविकास आघाडीने, तन मनाने या वेळी आपली ताकत खर्ची लावून सुद्धा बहुमताने उमेदवार निवडून आणता आले नसल्याने तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. विद्यमान आमदार यांच्या नेतृत्वात निवडून आलेल्या उमेदवारांना इथून पुढे आपली वाटचाल सुरु झाली असून आगामी निवडणुकीत बीजेपी आपलाच विजय खेचून आणणार असा आशावाद यावेळी विजयी समर्थकांनी व्यक्त केला आहे. 
आमदार बोदकूरवार यांचा करिष्मा कायम: वणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी अ‍ॅड. विनायक ऐकरे तर उपसभापती विजय गारघाटे यांची निवड आमदार बोदकूरवार यांचा करिष्मा कायम: वणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी अ‍ॅड. विनायक ऐकरे तर उपसभापती विजय गारघाटे यांची निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on May 24, 2023 Rating: 5
Powered by Blogger.