संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून वृद्धा आश्रमाला दहा हजार रुपयाची आर्थिक मदत व रुद्धांना फळांचे वाटप
सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : संजय रामचंद्र खाडे अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणी तसेच संचालक वसंत जिनिंग वणी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी या वृद्धाश्रमात जाऊन कुटुंबासहीत वृद्ध महिला व पुरुषांना फळ वाटप करून त्यांना सांत्वना व आधार दिला. त्या वृद्धाश्रमाला आर्थिक मदत म्हणून रुपये दहा हजार (10000) ची आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्यक्ष त्यावेळेस त्यांना पैसे देऊन महिला व पुरुष वृद्धांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुहास भाऊ नांदेकर हे उपस्थित होते व तसेच त्यांचे संचालक सुद्धा उपस्थित होते. वयाच्या उत्तरार्धात जो आधार मिळतो असा आधार देऊन संजय खाडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी या वृद्धाश्रमाला आर्थिक मदत केली. यापूर्वीसुद्धा अनेक विविध सामाजिक क्षेत्रात त्यांनी अग्रेसर ठिकाणी आर्थिक व सामाजिक सुद्धा मदत केली. विविध क्षेत्रात गरीब गरजू लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत व सहकार्य केले यानंतर सुद्धा वृद्धाश्रमाला मदत करत राहू असे त्यांच्या वतीने आश्वासन देण्यात आले.
या कार्याची सर्व लोकात संजय भाऊ खाडे यांचे कौतुक होत आहे. कारण सर्व क्षेत्रात विविध सामाजिक कार्यात त्याचा नेहमी हातभार लागत असतो, त्यामुळे कौतुकाचे उद्गार काढून त्यांच्या कार्याची प्रशंसा वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुहास भाऊ नांदेकर त्यांनी सुद्धा संजय भाऊ खाडे यांचे आभार मानले.
संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून वृद्धा आश्रमाला दहा हजार रुपयाची आर्थिक मदत व रुद्धांना फळांचे वाटप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 24, 2023
Rating:
