उद्या मारेगावात स्त्री शक्ती समाधान शिबीर

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तहसील कार्यालय तथा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय मारेगाव यांच्या संयुक्त विध्यमाने शहरातील बदकी भवन मध्ये 26 मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलाच्या हक्काचे सरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात समस्याग्रस्त पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडता येणार आहे. शासकीय यंत्रणेकडून महिलांच्या अडचणी कशा प्रकारे सोडविल्या जातात याबाबतचे मार्गदर्शन होणार आहे.तसेच समाजातील पीडित महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येऊन समुपदेशन करण्यात येणार आहे.

शासकीय स्तरावरून कोण, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ कसा घेता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. मार्गदर्शनासाठी जिल्हा स्तरावरून वनस्टॉप सेंटर, चाईल्ड लाईन, विधी सेवा प्राधिकरण, बाल सरक्षण कक्षाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

शासन स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती देण्यासाठी महसूल विभाग, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, नगरपंचायत, कृषि विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशु संवर्धन विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महिला बचत गट, महावितरण, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच इतर विभागातील अधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहे.

26 मे रोजी दुपारी 1 वाजता होणाऱ्या शिबिराचा तालुक्यातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मारेगाव तथा तहसीलदार मारेगाव यांनी केले आहे.
उद्या मारेगावात स्त्री शक्ती समाधान शिबीर उद्या मारेगावात स्त्री शक्ती समाधान शिबीर Reviewed by सह्याद्री चौफेर on May 25, 2023 Rating: 5
Powered by Blogger.