सह्याद्री चौफेर | राजू डावे
तालुक्यातील लाखापूर रस्ता पूर्णतः उखडला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्या उखडल्याने खड्ड्यांचा लांबून त्यांचा अंदाज येत नसून वाहन धारकांना प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागते.त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी स्वारांची गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाखापूर आकापूर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गांवर प्रवास करतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो असे बोलले जात आहे.
गेली अनेक वर्षापासून लाखापूर ते आकापूर हा पाच किलोमीटर अंतराचा रस्ता बहुतांश उखडलेला असून, या रस्त्यावर चार चाकी वाहन नाचत चालली असल्याचा भास होतो. शिवाय प्रवाशांच्या कंबर दुखण्यात तथा मणक्याच्या आजाराचे प्रमाण वाढण्याची ओरड असून त्यात रात्रीच्या वेळी कोणता खड्डा चुकवू अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी, यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले असून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
लाखापूर आकापूर रस्त्याची झाली चाळण,प्रशासनाचे दुर्लक्ष,ग्रामस्थांतून नाराजी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 25, 2023
Rating:
