वणी: फ्लॅट मध्ये तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत आढळून आला मृतदेह

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शहरातील कृष्णअपार्टमेंट मध्ये एका बंद खोलीत संशयास्पद मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी 29 में रोजी सकाळी साडे नऊ च्या दरम्यान, उघडकीस आली. सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. प्रिया देवानंद बागेश्वर (ता. वरोरा) जिल्हा चंद्रपूर असे मृतक तरुणीचे नाव आहे.

शहरापासून काही अंतरावर असलेल्या ब्राम्हणी रोड जवळ पेट्रोल पंप च्या मागे कृष्णअपार्टमेंट च्या खोलीत सदर मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. विशेष म्हणजे मृतक ही परजिल्ह्यातील असून तिच्या जवळ दोन आधार कार्ड आढळून आले, तरुणी रूम करून राहत असून ती चंद्रपूर येथील एका महाविद्यालयात शिकत होती अशी माहिती मृतकाच्या आई कडून पोलिसांना मिळाली, घटनास्थळी तिच्या डोक्याच्या मागून प्रहार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले, शिवाय बंद दरवाजा,संशयास्पद स्थितीत मृतदेह असल्याने घातपाताचीही शक्यता नाकारता येत नाही.


मृतक पंचवीस वर्षीय तरुणी ही साई मंदीर, जवळ वरोरा येथील असून ती वणी शहरातील ब्राम्हणी रोड जवळ पेट्रोल पंप च्या मागे कृष्णअपार्टमेंट मध्ये राहत होती. ती राहत असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने घरमालकांना स्थानिकांनी माहिती दिली, घर मालकांनी वणी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. बंद खोलीत अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला असून सदर तरुणीचा मृत्यू दोन तीन दिवसापूर्वी झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, मृतदेह अर्धनग्न स्थितीत आढळुन आल्याने घातपाताचीही शक्यता असून प्रकरण संशयास्पद आहे.

फिर्यादी घर मालक राकेश विजय डूबे (30) रा.गोकुल नगर वणी. यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी मर्ग दाखल करून तपासात घेतला. अधिक तपास व‍ पोलिस करीत आहेत.
वणी: फ्लॅट मध्ये तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत आढळून आला मृतदेह वणी: फ्लॅट मध्ये तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत आढळून आला मृतदेह Reviewed by सह्याद्री चौफेर on May 29, 2023 Rating: 5
Powered by Blogger.