त्या निराधार महिलेला जनसेवा फाउंडेशनचा आधार...

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

मारेगाव : ६ महिन्यापूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. मुलं पोरकी झाली, अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या निराधार मंजुळाबाईचे जगणे अवघड असून अशा महागाई च्या कठीण काळात हि विधवा महिला आपल्या विकलांग मूलीसोबत कानडा येथे वास्तव्यास राहते.

सख्या तू पैलतिरी....परीस्थिती गरीबीची असल्याने घराची स्थिती अतिशय खराब झाली होती, हि परिस्थिती जनसेवा फाऊंडेशन चे सचिव भुषणकुमार ढोबळे यांना फाऊंडेशन चे संचालक सुरज येवले यांचे मार्फत सामाजिक कार्यकर्ते रूपेश ढोके यांनी माहिती पोहचवली व क्षणाचा विलंब न करता फाऊंडेशनने जबाबदारी स्वीकारली व दूरस्तीकरिता सर्वोतपरी मदत केल्यामुळे आज त्या निराधार विधवा महिलेच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

मंजूळाबाई देवराव आत्राम (कानडा) या विधवा महिलेचे घरावरील छत्र हरवल्याचे निदर्शनास आणून देताच जनसेवा फाउंडेशनचे संचालक सुरज अंकुश येवले यांचेसह सचिव भुषणकुमार ढोबळे यांनी त्या मंजुळाबाईस शक्य होईल ती मदत करण्याचा दृढनिश्चय केला.

मंजुळा बाईला किती आनंद झाला, जगण्याला बळ मिळालं 
फाऊंडेशनने जबाबदारी स्वीकारली." हिच आमच्यासाठी मोठी नवलाई...रुपेश बाबा तुझं फार उपकार नारद बनून देव आमच्याकडे धाडले..आणि आम्हाला आधार दिला. मोठं पुण्याचं काम केलंस...!!असे गौरवउद्गागार मंजूळाबाई यांनी केले.