नगर परिषदेच्या चुकीच्या धोरणाचा युवासेनेच्या वतीने जाहीर निषेध


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : नगर पालिकेने वित्तीय वर्ष 2023 व 2024 मध्ये पाणिकरात 50 रुपये दरमाह वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ठराव 23 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आला. आता वणीकरांना पाणीकरात 600 रुपये वार्षिक भुदंड सहन करावा लागणार आहे. परिणामी शहरातील दूषित पाणीपुरवठा व पाणीकरात केलेली वाढ तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी युवासेनेच्या वतीने मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. 

शहरातील अनेक प्रभागात मागील वर्षी तीन दिवसातून पाणी एकदाच येते. म्हणजे महिण्याला फक्त 10 दिवस पाणी येते वर्षाच्या 365 दिवसात काही नागरीकांना 120 दिवसच पाणी मिळत आहे. मात्र, पाणी कर पुर्ण वर्षाचा भरावा लागत आहे. हा सदर नागरीकांवर अन्याय आहे.
परिणामी शहराच्या अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने जनतेच्या आरोग्याशी व जीवाशी न.प. ने जो खेळ सुरू आहे तो त्वरित थांबवावा याबाबत पाण्याचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्याचे पाणी तपासणी नमुने अहवाल पाठवून तपासणी करण्याची मागणी युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांनी केली आली. "जर दररोज पाणीपुरवठा झाला तर वाढीव पाणी कर भरण्यास हरकत नव्हती, मात्र तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असेल तर एका वर्षात फक्त तीन महिण्याचाच कर लावणे गरजेचे आहे". परंतु नगर परिषद वर्षभराचा कर घेत आहे या चुकीच्या धोरणाचा युवासेना जाहीर निषेध करते व नगर परिषदेविरुद्ध असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेत आहे.

या आंदोलनात वणीकर जनता नगर परिषदेचा पाणीकर भरणार नाही. व रस्त्यावर उतरून नगर परिषदेच्या वाढीव कराचा निषेध करणार व युवासेना यासाठी पुढाकार घेऊन कुणीही वणीकर नगर परिषदेचा पाणीकर भरणार नसल्याचे पत्रकही जनतेत वाटप करून याबाबतची जगजागृती करणार आहे. जर नगर परिषदेचा कर्मचारी किंवा अधिकारी जनतेच्या घरी जाऊन पाणीकर भरण्याबाबत बळजबरी करीत असेल तर त्याच्यासोबत तोंडी वाद झाल्यास यास प्रशासन जबाबदार राहील असा दमही देण्यात आला आहे. यावेळी करण नागपुरे, प्रितम वांधरे, चेतन उलमाले यांची उपस्थिती होती.


नगर परिषदेच्या चुकीच्या धोरणाचा युवासेनेच्या वतीने जाहीर निषेध नगर परिषदेच्या चुकीच्या धोरणाचा युवासेनेच्या वतीने जाहीर निषेध Reviewed by सह्याद्री चौफेर on May 31, 2023 Rating: 5
Powered by Blogger.