सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
याबाबत माहिती अशी की, करणवाडी ते रोहपट मार्गाने अवैधरित्या गुरे कत्तलीसाठी पायदळी नेत असल्याची माहिती मिळाली, मारेगाव पोलीसांनी करणवाडी ते रोहपट रोडवर बैलाच्या कळपाची पाहणी करत असतांना जीवनज्योत दवाखान्याकडे जाणाऱ्या रोड समोर 5 इसम हे बैलाचा कळप घेऊन जाताना दिसले. त्याचवेळी बैलाचा कळप सावलीत थांबवून चौकशी करण्यात आली असतांना त्यांनी तेलंगणा राज्यात दिग्रस मार्गे जात असल्याची कबुली दिली. त्यात तब्बल 3-3 बैलाचा कळप,15 जोड्या असे एकूण 45 बैल आढळून आले. बैलांना निर्दयीपणे गळ्यात दोराने फास बांधून भर उन्हात पायदळ कत्तलीसाठी घेऊन जात होते. मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजता पोलिसांनी बैलांची सुटका करत त्यांना जीवनदान दिले आहे. व सुरक्षेच्या दृष्टीने गुरुगणेश गौशाळा येथे गुरांना पाठविण्यात आले. याप्रकरणी तस्लिम खां वहाब खां कुरेशी (44) वार्ड 12, मारेगाव, मुकुंदा कलप्पा जाधव (35) मारेगाव, सुनील शामराव गुंजेकर (24) वार्ड नं- 4, मारेगाव, शंकर संभा भोजेवार (41) रा. मारेगाव, उमेश जनार्दन चाफले (31) वार्ड नं-7, मारेगाव यांना अटक करण्यात आली असून त्यांचे जवळून जुन्या बांबू ची 5 काठ्या, सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 5000/- व बैल 45 नग अंदाजे किंमत 9,00,000/- रुपये असा एकूण 9,05,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखाचे पोहेकॉ सुनील खंडागळे यांच्या फिर्यादीवरुन मारेगाव पोलीसात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मारेगाव पोलीस हेडकॉनस्टेबल चांदेकर तथा सुंकुरवार करीत आहे.
कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेत असलेल्या 45 जनावरांची सुटका
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 31, 2023
Rating:
