सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : आजच्या विज्ञान युगात विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर चे ज्ञान मिळणे ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पहापळ येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन. टी. चौधरी सर ,पदवीधर शिक्षक श्री. संजय फुलबांधे सर, श्री. अमर पुनवटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान होण्यासाठी दिनांक 2 मे 2023 पासून नियमितपणे सकाळी 8 ते 10 या वेळात प्रशिक्षण वर्ग घेतल्या जात आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांची वर्ग 1ते 5 आणि वर्ग 6 ते 8 अशा दोन बॅच मध्ये विभागणी केलेली आहे . पहापळ येथील संगणक तज्ञ अभिषेक भैय्याजी कनाके हे नियमितपणे विद्यार्थ्यांचे निशुल्क कॉम्प्युटर चे क्लास घेतात.त्यात कॉम्प्युटरची ओळख, बेसिक ज्ञान आणि एक्सेल वर्ड, पेंटिंग यासारखे अनेक प्रोग्राम शिकवले जातात. शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच गावातील इतरही मुले या कॉम्पुटर क्लास ला उपस्थित राहत आहेत.
उन्हाळी सुट्ट्यात कॉम्प्युटर चे वर्ग सुरु केल्याने विद्यार्थ्यांत तसेच पालकांत आनंद निर्माण झाला आहे आणि त्यांचा यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कॉम्प्युटर क्लाससाठी विद्यार्थ्यांना नियमितपणे उपस्थित ठेवण्यासाठी पहापळ येथील सरपंच श्री. राहुल आत्राम,पेसा समिती चे अध्यक्ष श्री. भैय्याजी कनाके .शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. अमोल गुरनुले,उपाध्यक्ष सौ. शितल भोयर आणि इतर सर्व सदस्य त्याचप्रमाणे शाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षिका सौ. वाघमारे मॅडम आणि गोंडे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
अभिषेक कनाके देतोय उन्हाळी सुट्ट्यातील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे विनामूल्य धडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 26, 2023
Rating:
