पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात 95 तक्रारी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात मारेगाव येथे आज 95 तक्रारी प्राप्त झाल्या. तहसील कार्यालय तथा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय मारेगाव यांच्या संयुक्त विध्यमाने शहरातील बदकी भवन मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण माजी सभापती अरुणाताई खंडाळकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मारेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, मारेगावचे तहसीलदार विवेक पांडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपक कळमकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका व्यवस्थापक डाहुले मॅडम, पशुधन विकास अधिकारी डॉ मिश्रा, डॉ राठोड, विस्तार अधिकारी मुनेश्वर अनिल राऊत,सरक्षण अधिकारी रोशन राऊत,प्रामुख्याने उपस्थित होते.

या समाधान शिबिरात तालुक्यातील महिलांनी 95 समस्या मांडल्या यामध्ये घरकुल योजना, बालसंगोपन, शौचालय, शिक्षण, रोजगार, निराधार, रॅशन कार्ड, विहीर योजनाचा समावेश होता. 95 तक्रारी मधून 23 तक्रारीवर तात्काळ कारवाही करण्यात आली. महिलाच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा,यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे मोठया संख्येने महिलांची या शिबिरात उपस्थिती होती.

आज दि.26 मे रोजी दुपारी 1 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराची सुरुवात झाली, 4 वाजता या शिबिराचा रीतसर समारोप करण्यात आला. प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपक कळमकर यांनी केले, सूत्रसंचालन गणेश चाव्हण, यांनी तर आभार रामटेके यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्मा कनाके, कांचन वनकर, नंदा आत्राम, अंकिता भगत, प्रेमीला मलकापुरे, अनुसया थेरे, प्रभावती खाडे, आशा खामणकर, गिता कांबळे यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहकार्य केले. 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात 95 तक्रारी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात 95  तक्रारी Reviewed by सह्याद्री चौफेर on May 26, 2023 Rating: 5
Powered by Blogger.