जिल्ह्यात बारावीचा निकाल 91.98 टक्के,मुलींनी मारली बाजी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परिक्षेचा निकाल आज गुरुवारी जाहिर करण्यात आला. या जिल्ह्याचा निकाल ९१.९८ टक्के इतका लागला आहे. या निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. तर जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधून महागांव तालुक्याने ९६.०९ टक्के निकाल लागुन जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.

यावर्षी १२ वीच्या परिक्षेला जिल्ह्यातून २९ हजार ९०७ नियमित विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी २७ हजार ५०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे १५१२ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे. तर ८ हजार ५५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच आहे. १३ हजार २०४ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण होण्याचा मान मिळाला आहे. शाखा निहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९७.८४ टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचा ६८५ विद्यार्थीनी या परिक्षेत उत्तीर्ण झाल्या असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९४.०२ एवढी आहे. मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी ३.९८ टक्के ज्यादा आहे.

तालुका निहाय निकालामध्ये महागांव तालुक्याचा सर्वाधिक ९६.०९ टक्के निकाल लागला आहे. नेर तालुका ९५.९३ तर बाभुळगांव तालुक्याचा ९४.८५ टक्के निकाल लागला आहे. आर्णी तालुका ९४.२६, कळंब तालुका ९२.२१, घाटंजी ९१.६९ टक्के, दिग्रस ९१.३५ टक्के, झरी जामणी ९०.५६ टक्के, राळेगांव ९०.५६ टक्के, मारेगांव ८९.८९ टक्के, पांढरकवडा ८८.०६ तर वणी तालुक्याचा निकाल सर्वात कमी निकाल ९२.२८ टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ८६.९१ टक्के एवढा लागला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमातून ८७.५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यावर्षी जिल्ह्यातील १४ हजार २७५ विद्यार्थी १२ वीत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालांची टक्केवारी ९०.१० टक्के आहे. तर १३ हजार ८०.८७ टक्के लागला आहे.

जिल्ह्यात बारावीचा निकाल 91.98 टक्के,मुलींनी मारली बाजी जिल्ह्यात बारावीचा निकाल 91.98 टक्के,मुलींनी मारली बाजी Reviewed by सह्याद्री चौफेर on May 26, 2023 Rating: 5
Powered by Blogger.