सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : मारेगाव हे यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. ह्या तालुक्याची "आदिवासी बहुल तालुका" म्हणून सुद्धा ओळख आहे. ह्याच तालुक्यात शेतकरी आत्महत्या, महिलावर अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वर्तमान पत्रातून आपण वाचत असतो. मागासवर्गीय असलेल्या ह्या तालुक्यात अशीच एक घटना घडली असून त्या नवविवाहितेने सासर च्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली.
तालुक्यातील गोंडबुरांडा येथे २० मे विवाहितेने स्वतःच्या राहत्या घरी दोराच्या सहायाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात मारेगाव पोलिस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह सासु-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रीना सुनील मुसळे (रामपुरे) हिचा प्रेमविवाह २०२२ मध्ये सुनील मुसळे याच्याशी झाला होता. ती चार महिन्यांची गर्भवती होती. ती पती व सासूसासरे यांच्यासोबत गोंडबुरांडा येथे राहत होती. गेल्या २० मे रोजी सायंकाळी रीनाने आपल्या राहत्या घरी छताला दोरीने गळफास लावून
आपली जीवनयात्रा संपविली. कुटुंबीय सायंकाळी शेतातून घरी परत आले असता, त्यांना रीना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. सासरकडील मंडळींनी रीनाशी भांडण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार रीनाच्या नातेवाइकांनी मारेगाव पोलिस ठाण्यात दिली.
त्यावरून संशयित आरोपी पती सुनील भाऊराव मुसळे (वय ३० वर्षे, सर्व रा. गोंडबुरांडा), सासरे भाऊराव मुसळे (वय ५२ वर्षे), सासू अंजना भाऊराव मुसळे (वय ४८ वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंडबुरांडा विवाहित आत्महत्या प्रकरण, या नंतर समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाल्यास सहन केले जाणार नाही. वारंवार कोलाम समाजावर होणारे अन्याय थांबले पाहिजे. नाहीतर क्रांतिवीर शामादादांनी कोलाम यांनी १९८० च्या दशकात कोलाम समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विद्रोह केला होता, तीच भूमिका आम्हाला घ्यायला भाग पाडू नका.-राहुल आत्रामजिल्हा अध्यक्ष, कोलाम संघटना
सुनेच्या आत्महत्याप्रकरणी पतीसह सासु-सासऱ्यावर गुन्हा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 26, 2023
Rating:
