सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : मागील 30 एप्रिल 2023 रोजी बाजार समिती च्या निवडणुक पार पडली. पहिल्यांदा दोन पॅनल उभे ठाकल्याने मारेगाव बाजार समिती ची दुहेरी लढत दिसून आली आहे.
बाजार समितीच्या 18 जागेपैकी 17 जागा महाविकास आघाडीने एकहाती मिळवल्या असून केवळ एक जागा बीजेपी च्या पदरात पडली आहे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याचे पहायला मिळाली आहे. विजय मिळवण्यासाठी फार उमेदवारांना मत पडली बा... असं काही फरक नाही. यामध्ये काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार व नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वातील शेतकरी एकता पॅनल च्या अपॉझिट विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, अनिल देरकर व विशाल किन्हेकर यांच्या त्रिनेत्र नेतृत्वाखालील शेतकरी परिवर्तन पॅनल, अशी एकूण 34 उमेदवारांनी आपलं नशीब अजमावलं,या निवडणुकीत ते उभे राहून मतदारासह नागरिकांचे भरपूर मनोरंजन केले गेले. मात्र, खरी गंम्मत जम्मत आता होणार आहे अशी मनोरंजनात्मक चर्चा चौफेर होत आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणासाठी कशी लाभदायक दुःखदायक ठरणार! याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
तोच होईल, शिलेदार असे काही जाणकारांचे मत आहे. कारण मागील काळापासून गाजावाजा करून जेनतेच्या मनात घर करून बाजार समितीवर अस्तित्व निर्माण करू पाहत आहे. त्यातल्या त्यात आधीच्यानी काय केलं आणि आता काय करणार ह्याबाबत कोणीही बोलायला सरसावत नाहीये...निवडणुक जिंकल्याने पुन्हा त्यांना सभापतीपद बहाल करण्यात येईल अशी अनेकांना स्वप्न पडत आहे. आपापल्या परीने जुगाड लावल्या जात आहे. त्यामुळे या एकहाती सत्ता संघर्षात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
विशेष उल्लेखनीय की, मारेगाव बाजार समितीवर काँग्रेस पक्षाची स्थापने पासून म्हणजे १९८४ पासूनच "पाटील" यांची बाजार समिती मध्ये एकहाती सत्ता राहिली आहे. सहकार क्षेत्रात नरेंद्र पाटील ठाकरे यांचा नेहमीच दबदबा राहिला आहे. आताही या निवडणुकीत त्यांची 'गहरी चाल' यशस्वी ठरली असून ते कोणाच्या गळ्यात बाजार समितीचा शिलेदार म्हणून माळ टाकतात हे अद्याप तरी अंदाज बांधता येत नाही, मात्र जर का? आम्हाला सभापती पद मिळालं नाही, तर सरळ राजीनामा देऊन आम्ही मोकळे होऊ अशी राजकीय वर्तुळात चर्चा असून ते कोण राजीनामा देणार हे देखील या घडीला सांगता येत नाही. तूर्तास बाजार समितीचे दावेदार कोण; "खुल जा सिमसीम" अशी म्हणायची वेळ आलीय का...?
बाजार समितीचा दावेदार कोण; "खुल जा सिमसीम"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 10, 2023
Rating:
