टॉप बातम्या

प्रा. डॉ. दिलीप अलोने सर यांचे महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परी निरीक्षण मंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : विदर्भाची आण बाण शान...आपल्या सर्वांचे परिचित, आपले मार्गदर्शक सुप्रसिद्ध लोककलावंत, नकलाकार, प्रा. डॉ. दिलीप अलोने सर यांची महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परी निरीक्षण मंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कलावंतांसाठी ही अतिशय गौरवाची बाब असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

विशेष म्हणजे या मंडळावर नियुक्त होणारे अलोने सर हे यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव कलावंत आहेत.
त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!!
Previous Post Next Post