महाराष्ट्र दिनानिमित्त टी डी आर एफ द्वारा नागरी सुरक्षेसाठी रॅली व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत व नोंदणीकृत असलेल्या टीडीआरएफ ला दि. ९ मे रोजी १८ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त १ ते ९ मे या कालावधीत टीडीआरएफ वर्धापन दिन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि.१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त वणी कंपनी (शाखा) च्या जवानांकडून TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा, गॅस सुरक्षा तसेच विविध आपत्तीच्या व्यवस्थापनाविषयी जनजागृती रॅली व गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
दि. १ मे ते ९ मे या कालावधीत संपूर्ण राज्यात TDRF वर्धापन दिन महोत्सव विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे.या मध्ये प्राणी व पक्ष्यांसाठी पाणपोई, विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  सकाळी रॅली काढण्यात आली.
या रॅलीची सुरुवात गव्हर्मेंट हायस्कूल येथून झाली त्यानंतर ही रॅली शहरातील टीळक चौक, गांधी चौक, दीपक चौपाटी व डॉ आंबेडकर चौक या प्रमुख मार्गांनी भ्रमण करीत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा, गॅस सुरक्षा व विविध आपत्ती व्यवस्थापन संदर्भात नारे देऊन जनजागृती केली. एवढेच नाही तर गांधी चौक, टीळक चौक व डॉ आंबेडकर चौक या तीनही चौकांमध्ये टीडीआरएफ जवानांकडून रस्ते सुरक्षा या विषयावर पथनाट्यही करण्यात आले.
या पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना वाहन चालवीत असताना हेल्मेटची आवश्यकता तसेच वाहतूक नियमांचे पालन करणे व इतरांनाही करायला लावणे तसेच प्रथमोपचार विषयाचे ज्ञान सर्वांना असणे का आवश्यक आहे घरातील गॅस संबंधित घ्यावयाची काळजी याविषयी पथनाट्यद्वारे प्रकाश टाकण्यात आला. या पथनाट्यप्रसंगी वाहतूक नियंत्रण उपशाखेचे पोलीस निरीक्षक संजय आत्राम व पोलीस स्टेशन वणी चे शेखर वांढरे व ज्ञानेश्वर आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते.सदर रॅली व पथनाट्याचे पोलीस विभाग व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. 
सदर रॅली व पथनाट्यासाठी टी.डी.आर.एफ. मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद, वणी कंपनी कमांडर गणेश बुरांडे, किरण चव्हाण, अस्मिता वाळके, काजळ वाळके,रोहिणी लेनगुले, बिंदिया उईके, सुमित जुमनाके, पृथ्वी पेंदोर, शिवम आवारी, रेखा उलमाले, गणेश सोनटक्के, प्राची डोंगे, संकेत काळे, वितेश वंजारी, लक्ष्मीकांत गाडगे, ईशा जुनगरी, अनुष्का नक्षीने, वैभव मडावी, संकेत काळे, आरती चव्हाण, स्नेह कौरसे, समीक्षा पाटील, त्रीशरणा दुपारे, प्रगती बढे इत्यादी टीडीआरएफ अधिकारी व जवानांनी परिश्रम घेतले.
सदरील रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडे, प्रा.डॉ.गजानन आघलते उपस्थित होते.


महाराष्ट्र दिनानिमित्त टी डी आर एफ द्वारा नागरी सुरक्षेसाठी रॅली व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती महाराष्ट्र दिनानिमित्त टी डी आर एफ द्वारा नागरी सुरक्षेसाठी रॅली व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती Reviewed by सह्याद्री चौफेर on May 01, 2023 Rating: 5
Powered by Blogger.