राजूर : हातात तलवार घेऊन पसरवणाऱ्या आरोपीस अटक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील राजुर कॉलरी येथील युवक हातात तलवार घेवून धुमाकुळ घालत दहशत पसरविणाऱ्या आरोपीस वणी पोलिसांनी रंगेहात अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तलवार जप्त करुन त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील राजूर येथे वणी पोलिस स्टेशन अंतर्गत राजूर कॉलरीत एक युवक तलवार हातात घेवून दशहत पसरवित असल्याची माहिती ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांना मिळाली. त्यांनी या प्रकरणी डीबी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पथकाचे माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, हरिन्द्र भारती, विशाल गेडाम, पुरुषोत्तम दडमल, शंकर चौधरी, सागर सिडाम या पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचा आदेशनुसार दि.30 मार्च ते 13 एप्रिल चे पर्यंत मध्यरात्री महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) प्रमाणे प्रतिबंधक आदेश असतांना राजूर कॉलरी येथील 21 वर्षीय त्रिशांत कवडू शाव हा हातात तलवार घेवून नागरिकांमध्ये दहशत पसरवित असल्याचे दिसून येताच पोलिस पथकाने आरोपीस शिताफीने अटक करुन त्यांच्याकडून तलवार जप्त केली. या प्रकरणी आरोपी विरुध्द आर्म अॅक्टनुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.
राजूर : हातात तलवार घेऊन पसरवणाऱ्या आरोपीस अटक राजूर : हातात तलवार घेऊन पसरवणाऱ्या आरोपीस अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on April 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.