वणीतील रेल्वे द्वार वर होणार उड्डाणपुल...!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातुन प्रवास करणाऱ्यासाठी वाढत्या वाहतुकीच्या वर्दळीमुळे वणी- वरोरा मार्गावर व चिखलगाव रेल्वे गेटवर उड्डाणपूल होणे अतिशय महत्वपूर्ण होते. या दोन ठिकाणी केंद्र शासनाच्या "सेतू बंधन' उपक्रमांतर्गत रेल्वे उड्डाणपूलाला मान्यता देण्यात आली आहे. याकरीता दोनशे कोटी रुपयांच्या निधीचा आराखडा आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कडे वारंवार केलेल्या पाठपुराव्याला मंजूर करण्यात आला आहे. 
शहरालगत असलेल्या यवतमाळ मार्गावरील चिखलगांव जवळच्या रेल्वे गेट नं 855/100-200 LC क्रमांक 2B व रेल्वे गेट करंजी वणी घुग्गुस रोडवर ROB चे बांधकाम MSH-14 Ch. 38/309 वणी तालुका जि. यवतमाळ गेट क्रमांक 855/100-200 LC क्रमांक 3AB / 3T अशा दोन उड्डाण पुलाचे काम तातडीने मार्गी लागणार असुन नागपूर वरून आभासी पद्धतीने या उड्डाण पुलाचे भुमीपुजन झाले आहे.
प्रस्तावीत उड्डाण पुलाची वणी शहरात नितांत गरज होती. अतिशय रहदारी चे हे मार्ग असुन या दोन्ही ठिकाणी टि पॉईंट असणार आहे. चिखलगांव जवळच्या उड्डाण पुलावरुन मुकूटबन कडे तर रेल्वे सायडींग जवळच्या उड्डाण पुलाजवळून वणी शहरात येण्याचा मार्ग उड्डाण पुलावरुन असणार आहे. केद्रीय मंत्री, रस्ते वाहतुक व महामार्ग, यांचे तांत्रीक सल्लागार बी. डी. ठेंग यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांना पत्र पाठवून सेतू बंधन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपूलांची प्रस्तावित कामे कोणत्या रस्त्यावर आहेत याची खातरजमा करून सदर रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत का याबाबत खातरजमा करण्यात यावी असे सुचवले आहे.
 वणी शहरात ये-जा करण्यासाठी विना अडथळा मार्गक्रमण व्हावे याकरीता उड्डाण पुलाची मागणी अनेक दिवसापांसुन वणीकर नागरिक करत होते. या लोकभावनेचा आदर करून विद्यमान आ. बोदकुरवार यांनी मतदार संघातील तब्बल सहा उड्डाण पुलाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देत पाठपुरावा केला. त्यामुळे दोन ठिकाणी केंद्र शासनाच्या "सेतू बंधन" उपक्रमांतर्गत रेल्वे उड्डाणपूलाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे वणी परिसरात आ. बोदकुरवार यांच्या कार्यशैलीवर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वणीतील रेल्वे द्वार वर होणार उड्डाणपुल...! वणीतील रेल्वे द्वार वर होणार उड्डाणपुल...! Reviewed by सह्याद्री चौफेर on April 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.