सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
चंद्रपूर : दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी संकट मोचन हनुमान मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजता विधीवत पूजा करुन हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले व तद्नंतर आरती करण्यात आली. त्यानंतर हवन सुध्दा करण्यात आले. यामध्ये बहुसंख्य नागरिकानी सपत्नीक सहभाग नोंदवला. तसेच सायंकाळी 7 वाजता पुनश्च एकदा हनुमान चालीसाचे पठण करून आरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाला सुरवात करण्यात आली. बहुसंख्य नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाच्या दिनप्रक्रियेमध्ये श्री संकट मोचन हनुमान मंदिर डी आर सी रोड छत्रपती नगर येथे चंद्रपूर चे लोकप्रिय आमदार माननीय श्री किशोरभाऊ जोरगेवार, यांनी भेट देऊन दर्शन घेतले व मंदिराच्या विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. याबद्दल मंदिर समितीने त्यांचे आभारही मानले. तसेच शिवसेनेचे श्री सुरेशभाऊ पचारे माजी नगरसेवक व शिवसेनेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री स्वप्निल भाऊ काशीकर यांनीसुद्धा मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री अमित करपे, सचिन पोडे, राकेश नाकाडे, सचिन चलकलवार, सुरेशजी चटारे, पुरुषोत्तम ठेंगणे, प्रमोद एडलावार, विनोद एडलावार, रोहित पुरमशेट्टीवार, सुमित करपे, पवन कन्नमवार, विपीन येलमूले, पुरुषोत्तम राव, महेंद्र तिवारी, राजेश कवाडघरे, अतुल रुईकर, सुमित भोजेकर, गौरीशंकर धामणकर, वैभव मिटकर, अनुप गेघाटे, संदीप मत्ते , नितीन मत्ते, बादल गोरलावार, पवन चामलवार, विकास तायडे, आशिष हेडाऊ, कृपाल नाकाडे, सचिन मत्ते, सचिन सपाट, विजय हिवरे, महेश भुत्तेवार आदींनी परिश्रम घेतले.
श्री संकट मोचन हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 07, 2023
Rating:
